ग्रामपंचायत शेवाळे उपसरपंचपदी जयश्री हरिचंद्र भगुरे यांची बिनविरोध निवड

0

शिंदाड, ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेवाळे ग्रामपंचायतमध्ये आज उपसरपंच पदासाठी निवडणुक सरपंच योगेश कौतिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपसरपंच शांताराम वाघ यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर निवडणूक घेण्यात आली.

उपसरपंच पदासाठी जयश्री भगुरे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य लताताई भोसले, अनिल पाटील, श्रीकांत पाटील, सुनिता पाटील, ग्रामसेवक संजय जाधव तसेच तंटामुक्ती अध्यक्ष भगवान पांडे, गावातील नागरिक नितीन भोसले, भरत भोसले, हरिचंद्र भगुरे, वाडीचे दीपक पाटील, नवणीत जैन यांची उपस्थिती होती. निवडणूक अधिकारी म्हणून सरपंच योगेश पाटील यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.