कोरोनाशी दोन हात करण्यासाठी ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’ उपक्रम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या महाराष्ट्र विभागातर्फे 24 ते 30 जानेवारी या कालावधीत ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून माजी सैनिक, त्यांचे कुटुंबियासह  तमाम भारतीयांना घरबसल्या सात दिवस विनामूल्य प्राणायाम ध्यान शिबिर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच भारतीय जवानांनी देशासाठी गाजवलेले शौर्य आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाच्या कथा ‘शौर्यगाथा’ मधून सांगितल्या जाणार आहेत.

‘महाराष्ट्र मेडिटेट्स’मध्ये देशातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. यात कारगील युद्धातील शहीद कॅप्टन सौरभ कालिया याचे वडील एन. जे. कालिया,जम्मू काश्मीर येथील अतिरेकीविरोधी लढ्यातील शाहिद मेजर मयांक वैष्णोई यांच्या पत्नी स्वाती वैष्णोई,कारगिल युद्धात शाहिद होण्यापूर्वी भारतीय इतिहासातील सर्वात कठीण अशा पर्वतीय युद्धात नेतृत्व केलेले शाहिद कप्तान विक्रम बात्रा यांचे आई-वडील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून ‘शौर्यगाथा’ सांगणार आहेत.

ध्यान शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागरिकांचे मानसिक स्थिरता,  मनशांती लाभावी,  फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढावी यासाठी दि २४ ते ३० जानेवारी या काळात दररोज वेगवेगळ्या वेळी विनामूल्य, ऑनलाईन प्राणायाम ध्यान सत्रे  आयोजित केली आहेत. ही सर्वांसाठी खुली असून यात सहभागी होण्यासाठी  https://aolmh.in/Maharashtra-Meditates या वेबसाईटवर नावनोंदणी करावी.

शौर्य, त्यागास देणार अनोखी मानवंदना!

आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्टेट टीचर कोऑर्डिनेटर राहुल सदाशिव पाटील म्हणाले, “देशाच्या संरक्षणासाठी अनेक सैनिक तरुण वयात कुटुंबीय व नातेवाईकांपासून दूर राहिले. त्यांच्या शौर्यास व त्यागास मानवंदना देण्यासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने  विनामूल्य प्राणायाम ध्यान शिबीर आयोजित केले आहे. महाराष्ट्रातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी तसेच अन्य नागरिकांनी  ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’ या सत्रात सहभागी व्हावे.”

गेल्यावर्षी दोन लाख नागरिक सहभागी

कोरोनाच्या संकटकाळात मदतीचा हात म्हणून 2021 पासून गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंगकडून मोफत प्राणायाम ध्यान शिबीर घेतले जात आहेत. ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’च्या पहिल्या टप्प्यात जवळपास 2 लाख नागरिक प्राणायाम ध्यान शिबिरात सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या अनेकांनी प्राणायाम सरावामुळे  फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेत वाढ झाली. तसेच कोविडमुळे निर्माण झालेली भीती आणि चिंता कमी झाल्याचे सांगितले.  त्यांच्यापैकी बरेचजण आर्ट ऑफ लिव्हिंग फौंडेशनच्या प्रशिक्षकांकडून शिकवली जाणारी ‘सुदर्शन क्रिया’ ही श्वसनप्रक्रियाही शिकले आहेत.

डिसेंबरमध्ये 20 हजार लोकांनी घेतला अनुभव

कोरोना महामारीच्या विरोधात द्याव्या लागणाऱ्या लढ्यात मदत करण्यासाठी ‘महाराष्ट्र मेडिटेट्स’ या प्रकल्पाच्या पहिल्या भागातील यशाने प्रोत्साहित होऊन आर्ट ऑफ लिव्हिंगने या प्रकल्पाचा दुसरा भाग मागील वर्षाच्या डिसेंबरमध्ये सुरु केला. त्यात २०,००० लोकांनी भाग घेतला आणि प्राणायाम ध्यानाचा फायदा अनुभवला. या सत्रातील प्रत्येक भागाचा कालावधी दररोज अर्धा तास असा होता. लोकांच्या सोयीनुसार सुमारे १४ तुकड्या आयोजित केल्या गेल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.