मोठी बातमी; सूर्यकुमार यादव ‘या’ आजाराने त्रस्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि टी-२० क्रिकेटचा राजा असलेल्या सूर्यकुमार यादव याच्यासंबंधी मोठी बातमी समोर आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तीन दिवसांनी सुरु होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी सुद्धा तो असणार नसल्याचं समोर येत आहे. आधीच दुखापत असतांना सूर्याच्या अडचणींमध्ये अजून वाढ झाली आहे. सूर्य एका आजाराने ग्रस्त असून यावर उपचार घेण्यासाठी तो परदेशात जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे. टीम इंडियाला वर्ल्डकप तोंडावे असतांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

सूर्याला नेमकी दुखापत कसली ?
सूर्यकुमार यादवला हर्नियाच निदान झालं आहे. सूर्य आता बंगळुरूमधील राष्ट्रीय अकादमीमध्ये आहे. हर्निया आजारावर उपचार घेण्यासाठी सूर्य जर्मनीमधील म्युनिक येथे जाणार आहे. सूर्यकुमार यादव याच्यावर शस्रक्रिया झाल्यानंतर रिकव्हर होण्यासाठी वेळ लागणार आहे. याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नाहीये. त्यामुळे सुर्यकुमार यादव यंदाच्या आयपीएलमध्येही खेळताना दिसण्याची कमीच शक्यता आहे. आयपीएल न खेळल्यामुळे सूर्याचं वर्ल्ड कपमधील संघातील जागेवर प्रश्नचिन्ह आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.