भुसावळात घरफोडी ; १० लाखांची रोकड लांबविली

0

भुसावळ;- बांधकाम करणाऱ्या मिस्तरीचे बंद घर फोडून ९ लाख ९० हजारांची रोकड लांबविल्याची घटना शहरातील श्रीहरी नगरात रविवारी ७ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली असुवुन याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीहरी नगर, भुसावळ येथील रहिवाशी मुकेशकुमार राधाकिशन कुमावत वय-४५ रा. हे बांधकाम मिस्तरीचे काम करतात. रविवारी ७ जानेवारी रोजी दुपारी त्यांचे घर बंद होते, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील बेडमध्ये ठेवलेले ९ लाख ९० हजारांची रोकड काढून चोरून नेले. हा प्रकार दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीला आला. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुकेशकुमार कुमावत यांनी तक्रार दिल्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.