संघर्षातून सुंदर पिचाई बनले अब्जाधीश ! ; वर्षाला आहे इतके वेतन .. !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सुंदर पिचाई यांचे नाव कुणाला माहित नाही ? ते सर्वपरिचित असले तरी त्यांची भारतात शिक्षण घेऊन अमेरिकेला जाण्यासाठी होणारी संघर्षगाथा एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे असेच म्हणावे लागेल. वडिलांनी वर्षभराचा पगाराएवढी रक्कम अमेरिका जाण्यासाठी लागणाऱ्या तिकिटाला दिली.  ते अमेरिकेत राहताना सुरुवातीच्या काळात आलेला आर्थिक पेच प्रसंग आणि त्यातून त्यांनी वाट काढून मिळविलेले अफाट यश हे सर्व रोचक आहे .

गुगल आणि अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाई आज संपूर्ण जगात प्रख्यात आहेत. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई, जगातील सर्वोच्च सीईओंपैकी एक म्हणून ओळखले जातात.

दर पिचाई आज करोडपती असले तरी त्यांचे सुरुवातीचे आयुष्य खूप संघर्षमय होते. पिचाई यांना मिळणारा पगार हजारो, लाखो किंवा कोटीत नसून ते अब्जावधी रुपये पगार मिळवतात. सुं अलीकडेच पिचाई यांना नुकतेच अमेरिकेत भारतातील प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना भारत सरकारने वर्ष २०२२ साठी व्यापार आणि उद्योग श्रेणीसाठी दिला आहे. पिचाई यांना अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी हा सन्मान दिला. या खास प्रसंगी सुंदर पिचाई भावूक दिसले.

अमेरिकेला जाण्यासाठी वडिलांनी दिला वर्षभराचा पगार

सुंदर पिचाई म्हणतात की, “जेव्हा अमेरिकेत अभ्यासासाठी जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते कमी सोपे नव्हते. त्यावेळी वडिलांचा एक वर्षाचा पगार देऊन मला तिकीट काढावे लागले.” एक काळ असा होता की सुंदर पिचाई यांना भारतातून अमेरिकेला जाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र, आज त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे, की ते केवळ विमानाचे तिकीटच नाही तर विमान देखील खरेदी करू शकतात.

अमेरिकेत केला खूप संघर्ष

भारतीय वंशाच्या पिचाई यांचा जन्म 12 जुलै 1972 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण भारतातच पूर्ण केले. आयआयटी खरगपूरमधून अभियांत्रिकी केल्यानंतर त्यांनी व्हार्टन बिझनेस स्कूलमधून MBA शिक्षण पूर्ण केले. तर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी मेटलर्जिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. अमेरिकेत राहताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला. तिथला खर्च भागवणं त्यांच्यासाठी खूप अवघड होते.

अमेरिकेत संगणक पहिल्यांदा  पाहिला

एका मुलाखतीत सुंदर पिचाई म्हणाले होते की; आज ते जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीचे प्रमुख असले तरी अजूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत.” त्यांचे जुने दिवस, संघर्ष आणि बालपण ते कधीच विसरले नाहीत. त्यामुळे त्यांना पुढे जाण्याची ऊर्जा मिळते. जेव्हा ते अमेरिकेत आले होते तेव्हा ISD कॉलचे शुल्क प्रति मिनिट 2 डॉलर होते. खर्च जास्त असल्याने त्यांना घरच्यांशी जास्त वेळ बोलता येत नव्हते. आयुष्यात पहिल्यांदा पिचाई यांनी फक्त अमेरिकेत संगणक पाहिला.

दरमहा सुमारे 20 दशलक्ष डॉलर पगार

जगातील सर्वात महागडे CEO आज पिचाई हे आहेत. सुंदर पिचाई यांची एकूण संपत्ती अंदाजे 1310 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 10,810 कोटी रुपये आहे. सुंदर पिचाई यांची निव्वळ संपत्ती दरवर्षी वाढते. पिचाई यांचा वार्षिक पगार 242 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1,880 कोटी रुपये आहे. त्याच वेळी, त्यांना दरमहा सुमारे 20 दशलक्ष डॉलर पगार मिळतो, जो जगातील सर्वात मोठ्या पगारांपैकी एक आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.