विनयभंगाचा गुन्हा जिव्हारी; ग्रंथालय परिचरची रेल्वे समोर झोकून देत आत्महत्या…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगावातील शैक्षणिक क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. मात्र तोच त्याच बातमीचे पडसाद असे काही उमटले कि, दुपारी त्या संबंधित गुन्ह्यातील आरोपीने आपली जीवन यात्राच संपवल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोप असलेल्या आरोपीने शिरसोली ते दापोरा रेल्वेरुळावर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, २० वर्षीय विद्यार्थिनीने दि. २६ ऑक्टोबर रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर कैलास दत्तात्रय कडधाने (५३) विरुद्ध विनयभंग केल्याची फिर्याद रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार मंगळवारी ३१ रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर कडधाने यांनी स्वतःला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. रेल्वे पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ तालुका पोलीस स्टेशनला संबंधित घटने बाबत सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला असता, सीएमओ डॉ. सचिन पाटील यांनी त्यांना मयत घोषित केले. सुरुवातीला अनोळखी व्यक्ती म्हणून पोलीस तपास करीत होते. मात्र मृतदेहाची ओळख पटताच नातेवाईकांना सदर माहिती देण्यात आली. मयत कैलास कडधाने यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.