मराठा आरक्षणासाठी पुन्हा एका तरुणाची आत्महत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आंदोलन करत आहे. या आंदोलनाला काही भागात हिंसक वळण लागलं आहे, तर काही भागात अद्याप शांततेत आंदोलन सुरु आहे. तर काही तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

मराठा आरक्षणासाठी आणखी दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. संगमनेर तालुक्यात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. घराच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सागर वाळे (वय २५) असं या तरुणाचे नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे

‘आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा’, आरक्षण नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.