Maratha Reservation; पुण्यातील नवले पूल परिसरात टायर जाळून रास्तारोको, वाहतूक ठप्प

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटला आहे. मनोज जरंगे यांचं अंतरवली सराटी यतेचे उपोषण सुरू असून, त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलने केली जात आहे. आज पुण्यातील नवले पूल परिसरात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावरून वाहतूक अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. वडगाव तसेच पुलावर वाहनांचे टायर जाळत वाहतूक अडवण्यात आली.

मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी नवले ब्रीज येथे घोषणाबाजी करत आंदोलनास सुरुवात केली आहे. आंदोलनस्थळी वाहनांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच या ठिकाणी मराठा समाजाच्या तरुणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रचंड रहदारी असणारा हा रस्ता बंद केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्यांच्या लांब रांगच रांग लागल्या आहेत. यामध्ये शेकडो नागरिक अनेक तासांपासून अडकून पडले आहे. या वाहतूककोंडीमुळे सर्वच नागरिकांना त्रास होत असल्याचे दिसत आहे.

जवळपास पाच पाच किलोमोटारच्या वाहनांच्या रंग लागल्या असून मोठी वाहतूक कोंडी महामार्गावर पाहावयास मिळत आहे. यावेळी पुणे पोलीस घटनाथली दाखल झाले असून, आंदोलनकर्त्यांना आंदोलन महामार्गावरून बाजू घेण्याची विनंती करत आहेत. परंतु आंदोलक आक्रमक होऊन महामार्गावरच ठिय्या माडाला आहे. यामुळे पोलीस देखील हतबल झाल्याचे महामार्गावरून दिसून येत आहे. तसेच पुणे पोलीस दोन-तीनचे डीसीपी सोहेल शर्मा हे देखील आंदोलन करतांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यास विनंती करत आहे. आंदोलनकर्ते देखील त्यांना त्याचप्रमाणे विश्वास देत होते. यावेळी जवळपास हजारो कारकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे तसेच बघ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केले असून, वाहतूक नियंत्रण करण्याचा अडथळा येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.