मोठी बातमी; मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक, बीडमध्ये शासकीय कार्यालयांवर दगडफेक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा लढा चांगलाच पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असून, राज्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. कालपासून या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पाहायला मिळाले. बीडमध्ये मराठा मराठा आंदोलकांनी बसवर दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आजही बीड आणि कोल्हापूरमध्ये मराठा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला.

आत्तापर्यंत शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला वेगळे वळण लागले आहे. बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळले. बीडच्या वडवणी शहरात आंदोलकांनी शासकीय कार्यालयांवर दगडफेक केली आहे.

आंदोलकांनी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तहसील कार्यालय फोडले. या दगडफेकीनंतर शहरात स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

तसेच बीडच्या धामणगावमध्येही मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठा बांधवांनी बीड- कल्याण हा राज्य महामार्ग टायर जाळून अडवत रास्ता रोको सुरू केले. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील जे आदेश देतील त्या पध्दतीने आंदोलन करण्यात येतील, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.