प्रसिद्ध गायक हार्डी संधुचा महिलेकडून विनयभंग

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गर्दीच्या ठिकाणी, लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान अनेक महिला सेलिब्रिटींना विनयभंगाचा सामना करावा लागतो. पण पुरुषांना देखील अशा धक्कादायक गोष्टींना सामोरे जावे लागते. प्रसिद्ध पंजाबी गायक हार्डी संधू याला असच अनुभव आला आहे. नुकताच त्याने याबाबत खुलासा केला आहे. हार्डीचा मोठा चाहता वर्ग आहे आणि हार्डी संधू खासगी कार्यक्रमांमध्येही परफॉर्म करताना दिसतो.

हार्डी संधूने दिलेल्या मुलाखतीत एक खळबळजनक खुलासा केला आहे. एका खासगी कार्यक्रमादरम्यान त्याचा लैंगिक छळ झाल्याचे हार्डीने सांगितले आहे. आणि त्याचे लैंगिक शोषण एका महिला चाहतीने केल्याचे त्याने सांगितले.

स्टेजवर परफॉर्म करताना फिमेल फॅन्सकडून आग्रह
हार्डी एकदा खासगी कार्याक्रमांमध्ये परफॉर्म करत होता. दरम्यान, एका महिलेने त्याला स्टेजवर येऊ देण्याची विनंती केली. असा आग्रह केला. हार्डीने या महिलेला खूप समजावण्याचा प्रयत केला खरा पण, त्यात तो अपयशी ठरला. साधारण या महिलेचं वय ३० ते ४५ च्या आसपास होत. तिच्या हट्टामुळे ‘मंचावर या’ असे म्हणण्यास नाईलाज झाला. या महिलेने मला एका गाण्यावर डान्स करण्याची विनंती केली. तिच्या या विनंतीचा मन ठेवत हार्डीने तिच्यासोबत गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात केयी. पण त्यानंतर असे काही हदले की, ज्यामुळे हार्डीला जबदस्त धक्का बसला.

मुलाखतीदरम्यान हार्डीने सांगितले की, डान्स केल्यांनतर या महिला चाहतीने त्याला विचारले, की मी तुला मिठी मारू शकते का? ज्यावर हार्डीने होकार दिला. यानंतर या महिला चाहतीने हार्डीला मिठी मारली आणि त्याचे कान चाटू लागली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे हार्डीला धक्का बसला.

Leave A Reply

Your email address will not be published.