मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
नवी मुंबईत येथे एक धक्कादायक घटना आहे. एका १७ वर्षाच्या गरोदर मुलीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. प्रेम प्रेमप्रकरणातून प्रेयसी गरोदर राहिल्यानंतर प्रियकराने लग्नाला नकार दिल्यानंतर अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अल्पवयीन मुलगी ही ५ महिन्याची गरोदर होती. गोवंडी येथे राहणाऱ्या एका मुलगी या मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर प्रियकराने तिला लग्नाला नकार दिला. मुलगी गरोदर राहिल्याची माहिती कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी तिला विचारणा केली. त्यानंतर या मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी प्रियकराला अटक केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.