शाळेत 14 वर्षीय मुलीने केलेल्या गोळीबारात 1 जण ठार, पाच जखमी

0

मॉस्को ;- रशियातील ब्रायन्स्क येथील एका 14 वर्षीय मुलीने शाळेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका 14 वर्षांच्या मुलीने शाळेत बंदूक आणली होती.

या बंदुकीच्या मदतीने तिने तिच्या एका वर्ग मित्रावर गोळी झाडली. या गोळीबारात त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. यानंतरही या मुलीने गोळीबार केला ज्यात इतर पाच जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या मुलीकडे असणारी बंदुक ही तिच्या वडिलांची आहे. ही बंदुक तिने शाळेत का आणली? आणि थेट तिच्या वर्ग मित्रावर का चालवली याबाबतची माहिती अजून स्पष्ट झालेली नाही. या घटनेचा तपास सुरू असून या मागचे कारण लवकरच स्पष्ट होईल असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.