‘सुभेदार’ फेम ‘या’ अभिनेत्याची लागली दाक्षिणात्य चित्रपटात वर्णी, वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सुभेदार (Subhadar) चित्रपटात तानाजी मालुसरेंची (Tanaji Malusare) भूमिका साकारून अभिनेता ‘अजय पुरकर’ (Ajay Purkar) यांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप सोडली आहे. आणि त्यांच्या अभिनयाची दखल घेतली ती म्हणजे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीने. ‘सुभेदार फेम’ अभिनेते अजय पुरकर यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्यांनी त्यांच्या अभनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अजय पुरकर यांनी अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केलं असं म्हंटले तर, चुकीचे ठरणार नाही.

अजय पुरकर ‘स्कंदा’ (Skanda) या दाक्षिणात्य चित्रपटात अ‍ॅक्शन करतांना दिसणार आहे. स्कंदा चित्रपट १५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अजय पुरकर यांनी ‘पावनखिंड’ (Pawankhind) चित्रपटात देखील बाजीप्रभू देशपांडे (Baji Prabhu Deshpande) यांची भूमिका साकारली होती आणि ती सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. याच चित्रपटातील भूमिका प्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शक बोयापती श्रीनिवास (Boyapati Srinivas) यांना प्रचंड आवडली. आणि तेव्हाच अजय यांना विचारणा झाली.

काय म्हणाले अजय पुरकर
अजय पुरकर म्हणाले, “अनुभवसमृद्ध वेगवेगळ्या भूमिका करणं हे कलाकारांचं स्वप्नं असत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने स्वतः ची ओळख निर्माण केली आहे. त्यांची कामाप्रती मोठी श्रद्धा असते. या सर्व बाबी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. ‘स्कंदा’ या चित्रपटामुळे या सर्वांचा अनुभव घेता आला. एका उत्तम कॅनव्हासवर काम केल्याचा आनंद आहे, असेही अजय पूरकर पुढे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.