Stock Market Crash; सर्वात मोठी घसरण ‘या’ अब्जाधीशाच्या संपत्तीत

भारतातील अंबानी अडाणी यांच्यासह टॉप १४ अब्जाधीशांच्या संपत्तीत घट

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बुधवारी भारतासोबतच जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. त्यामुळे जगातील २२ अब्जाधीशांच्या संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. २२ अब्जाधीशांच्या संपत्तीत एकाच वेळी खूप मोठी घसरण बघायला मिळाली आहे. या अब्जाधीशांच्या संपत्तीत सामूहिक ३ लाख कोटी रुपयांची म्हणजेच ३६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घट बघायला मिळत आहे.

ज्यात सर्वात जास्त नुकसान इलॉन मस्क (Elon Musk) आणि बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांचे झाले आहे. भारतातील अंबानी अडाणी यांच्यासह टॉप १४ अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे.

जर डॉलरमध्ये पाहिले तर हा आकडा ३६ अब्ज डॉलर्सपेक्षा खूप जास्त आहे. इलॉन मस्क व्यतिरिक्त बेझोस, झुकेरबर्ग, बिल गेट्स, अंबानी आणि भारतातील नामवंत अंबानी व अदानी यांचाही या यादीत समावेश आहे. तसे पहिले तर टॉप 10 अब्जाधीशांच्या घसरण झाली असून, सर्वात जास्त मोठी घसरण इलॉन मस्कच्या संपत्तीत दिसून आली. बुधवारी, मस्कची एकूण संपत्ती सुमारे 5 अब्ज डॉलरने कमी होऊन 233 अब्ज डॉलर झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.