शेअर मार्केट कोसळले; सेन्सेक्समध्ये 700 अंकांची घसरण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेअर मार्केटमध्ये घसरण सुरुच असून सलग पाचव्या दिवशी मार्केटने लाल झेंडा फडकावला आहे. बाजाराच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रामध्ये सेन्सेक्स तब्बल 700 अंक, तर निफ्टी 200 अकांनी गडगडला. बँक निफ्टीही अडीचशे अंकांनी पडल्याने गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्स 58500 च्या, तर निफ्टी 17500 च्या खाली ट्रेड होत आहे.

फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो आणि डिजीटल मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या पेटीएमच्या शेअरने गुंतवणूकदारांना रडवले आहे. झोमॅटोचा शेअर गेल्या वर्षी मार्च महिन्यात लिस्टींग झाला होता. या शेअरचा भाव 160 रुपयांवरून घसरत 100 रुपयांच्याही खाली आला आहे. लिस्टींगनंतर पहिल्यांदाच झोमॅटोने निच्चांकी पातळी गाठली आहे.

दुसरीकडे पेटीएमच्या शेअरमध्येही घसरण सुरुच आहे. 2150 रुपयांचा हा शेअर आता 1000 रुपयांच्याही खाली आला आहे. आयपीओ लागलेल्या गुंतवणूकदारांना यामुळे तब्बल 57 टक्के नुकसान झाले आहे.

जागतिक बाजारही कोसळला

जागतिक बाजाराचे प्रेशर हिंदुस्थानच्या शेअर मार्केटवर दिसत आहे. अमेरिकेचा डो जोनस गेल्या काही दिवसांपासून लाल निशाण दाखवत आहे. लास्ट सेशनलाही डो जोनस तब्बल दीड टक्के पडला. याचा प्रभाव हिंदुस्थानच्या मार्केटमध्येही दिसत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.