जिल्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध ; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

0

जळगाव ;-  जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत जिल्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानबध्द केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीसह एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना दणका देत दोघांना स्थानबध्द केले आहे. यातील प्रकाश चंद्रकांत कंजर ( वय ३४, रा. खंडेराव नगर, जळगाव) हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांच्यावर आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला एक वर्षासाठी ठाणे येथील कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

यासोबत, सोनू रामेश्‍वर पांडे (वय २४ रा. मामाजी टॉजीक मागे, भुसावळ ) याच्यावर आर्म ऍक्टसह एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला पुणे येथील कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.