जळगाव केंद्रावरील राज्यनाट्य स्पर्धा एक दिवस उशिराने…

0

 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क:

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ६१ वी महाराष्ट्र राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धा जळगाव (State Drama Competition at Jalgaon Center) केंद्रावर दि. २४ नोव्हेंबर पासून सुरु होणार होते. मात्र आता काही तांत्रिक अडचणीमुळे स्पर्धेची सुरुवात व उद्घाटन समारंभ हा एक दिवस उशिराने म्हणजेच 25 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.

सविस्तर वृत्त असे की, २४ नोव्हेंबर रोजी सादर होणारे नाटक “अजूनही चांद रात आहे”.(सुबोध बहुउद्देशीय युवा प्रतिष्ठान जळगाव). या नाटकातील मुख्य कलावंताची अचानक प्रकृती अस्थिर झाल्याने, त्यांना दि. २२ रोजी हॉस्पिटल मधे उपचारासाठी दाखल करावे लागले आहे, त्यांना किमान ७ ते १० दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावे लागणार असल्याचे समजते, त्यामुळे दि. २४ रोजी होणारे उदघाटन हे दि. २४ ऐवजी दि. २५ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात होईल, यावेळी संजीवनी फाऊंडेशन, जळगाव या संस्थेच्या जुगाड ह्या नाटकाने स्पर्धेस सुरुवात होईल.

कलावंत आणि रसिक प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन भूषण वले समन्वयक,जळगाव केंद्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.