शिरसाड जि.प.शाळेत माता-पालक सभा

0

 

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क:

येथून जवळच असलेल्या शिरसाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.१९ रोजी निपुण भारत कार्यक्रम व निपुण महाराष्ट्र उत्सव अंतर्गत माता पालक गटाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नईम शेख, साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी यांची उपस्थिती लाभली.

त्याचबरोबर शिरसाड गावाचे उपसरपंच राजू बन्सी सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दीपाली सुभाष इंगळे यांच्यासह माता गटाच्या लीडर सौ. भारती रविंद्र खांबायत, सौ. ज्योती कैलास ठाकूर, सौ. सविता समाधान मिस्तरी, सौ. मोनाली दीपक खांबायत यांच्यासह इतर अनेक माता पालक उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित लीडर माता व इतर मातापालकांना गटशिक्षणाधिकारी शेख यांनी निपुण भारत कार्यक्रमाचा हेतूसह माता गटाच्या निर्मितीचा उद्देश, यामधील लीडर मातांची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित माता पालकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करत गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला. सदर सभेस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक (Teacher) उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.