पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या अनेक लोकं सेक्सटॉर्शनला (Sextortion) बळी पडत आहेत. पुण्यात (Pune) दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या (Dattawadi Police Station) हद्दीत शुभम वाडकर या विद्यार्थ्याने सेक्सटॉर्शनला बळी पडून आत्महत्या केली होती. अशाच पद्धतीने अनेकांची फसवणूक केली होती. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी अखेर राजस्थान (Rajasthan) गाठलं. इतकेच नव्हे तर अगदी राजस्थानी वेषभूषा करून आरोपीला जेरबंद केले. दरम्यान चौकशीतून धक्कादायक बाब उघडकीस आली. ती म्हणजे अलवर जिल्ह्यातील (Alwar District) गुरूकोठडी या अख्ख्या गावाने देशभरात सेक्सटॉर्शनचा धुमाकूळ घातला आहे.
राजस्थानमध्ये अलवार जिल्ह्यातील गुरू कोठडी गाव आहे. या गावात एकूण घर 560 आणि प्रत्येक घरात ॲानलाईन फसवणूक घालायचा व्यवसाय चालतो. देशातले अनेक नावाजलेले उद्योजक, न्यायाधीश, वकील यांना या गावाने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकून गंडवले आहे.
पुण्यात तरुणाने केलेल्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दत्तवाडी पोलीस स्टेशमधील पोलीस अधिकारी या गावात पोहोचली. कुणी आपल्याला ओळखू नये म्हणून पुणे पोलिसांनी या गावात जाण्याआधी वेषांतर केला. त्यानंतरस्थानिक पोलिसांच्या मदतीने गावात एंट्री केली आणि अन्वर सुभान खान या आरोपीला अटक केली.
संपूर्ण गावच हा व्यवसाय करायला लागल्यावर आजूबाजूच्या गावातल्या मुलांना ट्रेनिंग देण्याचे कोर्सेस ही या गावात चालवले जातात. आरोपी पकडल्यावर जेव्हा त्याला ट्रांझिट रिमांडसाठी न्यायालयात नेल्यावर न्यायालायाने थेट चार दिवस रिमांड देत असा प्रकार त्यांच्या सोबतही घडल्याचं तपास पथकाला सांगितलं.
ज्या रेल्वेने पोलीस पुण्यात परत आले त्या रेल्वेच्या टीसीला ही असाच गंडा घातल्याने त्याने पोलिसांना तातडीने बर्थ उपलब्ध करून दिल्या. प्रीती शर्मा किंवा प्रीत यादव या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून ही फसवणूक केली जायची, अशी माहिती तपास अधिकारी अक्षय सरोदे यांनी दिली.