Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
    ताज्या बातम्या

    दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 28, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल ऑनलाइनद्वारे जाहीर झाला. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

    राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट, तर माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा ९ आणि १० ऑगस्ट या कालावधीत आयोजित केली होती.

    तसेच संपूर्ण राज्यात २० जुलै रोजी असलेल्या बारावीच्या विषयाची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी आणि दहावीच्या विषयाची परीक्षा २ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. तसेच २८ जुलै रोजी असलेल्या दहावीच्या विषयाची परीक्षा ३ ऑगस्ट रोजी घेण्यात आली.

    माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार,  उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन:श्च फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणारी अंतिम परीक्षा देता येणार आहे.

    HSC SSC SSC-HSC Result
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif