8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी

0

मुंबई ;- ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी मुलींच्या शुल्कात माफी देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकार शैक्षणिक संस्थाना या खर्चाची परतफेड करेल. जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षणात याव्यात यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रकात पाटील यांनी कुलगुरुंच्या बैठकीत शुक्रवारी याची घोषणा केली. सध्या मुलींना शैक्षणिक वर्षात ५० टक्के शुल्क माफी होती. आता ही शुक्लमाफी १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.