‘बाय-बाय हार्ट अटॅकवर उद्या कार्यक्रम

0

डॉ. रतन राठोड आणि डॉ. सचिन परब करणार मार्गदर्शन

जळगाव : `बाय-बाय हार्ट अॅटॅक` हा हृदयरोगावर मात करण्यासाठीचा मार्गदर्शनपर कार्यक्रम उद्या रविवार दि. 4 फेब्रुवारी, संध्याकाळी 5.30 वाजता ब्रह्माकुमारी विद्यालयात आयोजित केला आहे.

बदलती जीवनशैली आणि आहार-विहारातील बदलामुळे हृदयरोग आजार दिवसेंदिवस वाढत आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मार्गदर्शनपर लोकप्रिय कार्यक्रम बाय-बाय हार्ट अॅटॅक रविवारी संध्याकाळी 5.30 वाजता ब्रह्माकुमारी विद्यालय, ढाके कॉलनी, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे. भारतात हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय ठरला असून मुंबई येथील सुप्रसिद्ध कॉर्डिऑलॉजिस्ट डॉ. रतन राठोड, विभागप्रमुख कॉर्डिऑलॉजी विभाग, एम.जी.एम. मेडिकल कॉलेज, मुंबई आणि मुंबई येथील डॉ. सचिन परब, लाईफ कोच ट्रेनर आणि सचिव, मेडिकल प्रभाग, ब्रह्माकुमारीज् माऊंट आबू हे मार्गदर्शन करणार आहेत. मेडिकल प्रभाग, ब्रह्माकुमारीज्च्या वतीने आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून उपस्थितीचे आवाहन ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी केले आहे.

बाय-बाय हार्ट अॅटॅक Programme Promo Link : https://youtu.be/3UW0NFr4ogc?si=xqrduOAHU-m-2YAH

Leave A Reply

Your email address will not be published.