रेल्वे विभागात बंपर भरती, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही मोठी आणि महत्वाची बातमी ही तुमच्यासाठी आहे. विशेष बाब म्हणजे थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. रेल्वे विभागाकडून मेगा भरती राबवली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोटजी संधी आहे. लवकरच रेल्वे विभागाकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध केली जाऊ शकते. विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जाणार आहे. १० वी, आयटीआय आणि पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

फेब्रुवारी २०२४ च्या शेवटी या भरती प्रक्रियेची जाहिरात ही रेल्वे विभागाकडून प्रसिद्ध केली जाऊ शकते. मार्च ते एप्रिल दरम्यान भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणासाठी अट ही लागू केली जाईल. या भरती प्रक्रियेतून ९ हजार तंत्रज्ञांच्या जागा या भरल्या जाणार आहे. रेल्वेकडून ही बंपर भलतीच राबवली आहे.

अजूनही या भरती प्रक्रियेबद्दलच्या तारखांबद्दल कोणत्याही प्रकारची घोषणा ही करण्यात नाही आली. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी indianrailways.gov.in या साईटवर लक्ष ठेवावे. indianrailways.gov.in वरच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू असणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 33 असणे आवश्यक आहे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडीसी सूट ही मिळू शकते.

रिपोर्टनुसार, या भरती प्रक्रियेसाठी काही परीक्षा या उमेदवारांच्या घेतल्या जातील. हेच नाही तर संबंधीत ट्रेडचा देखील एखादा पेपर घेतला जाईल. या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक अपडेटसाठी उमेदवारांना indianrailways.gov.in या साईटवर लक्ष हे ठेवावे लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व अपडेट हे आरामात मिळतील.

Leave A Reply

Your email address will not be published.