सुप्रीम कॉलनीत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

0

जळगाव ;– तरुणाने तणावातूनस्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील सुप्रीम कॉलनी येथे आज शनिवारी दि.३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. .या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गणेश मुरलीधर सोनार (वय – ४२ रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो पत्नी, एक मुलगा यांच्यासह वास्तव्याला आहे. त्याच्या मुलीचे लग्न झाले आहे. तो कोटिंग काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान शुक्रवारी रात्री झोपल्यानंतर कधीतरी मध्यरात्री त्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला.

नातेवाईकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्यास मयत घोषित केले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.