Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    • होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी भरती
    • वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास शासन अपयशी?
    • भुसावळमध्ये 21 किलो गांजा जप्त; सख्ख्या भावांना अटक
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 4, 2023Updated:December 4, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पहूर ता. जामनेरः येथून जवळच असलेल्या हिवरखेडा येथे शेतातील तुटलेली वायर जोडत असताना विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दि.३रोजी रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

    योगेश अशोक पाटील (वय २४) नेहमीप्रमाणे आपल्या गावालगत असलेल्या केळीच्या शेतात गेले असता त्यांना वायर तुटलेली आढळली.

    तुटलेली वायर जोडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना विजेचा जबर धक्का बसल्याने त्यांनी जोरात किंकाळी ठोकली अन् ते जमीनीवर कोसळले. त्यांच्या त्या आवाजाने बाजूलाच क्रिकेट खेळत असणाऱ्या मुलांनी सदर घटनेची माहिती गावातील लोकांना दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत योगेश अशोक पाटील यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नजमुद्दीन तडवी यांनी उपचारांती त्यांना मृत घोषित केले. परिचारिका योगिता नागरे-पाटील, ललीत केवट व सहकार्यांनी उपचारादरम्यान मोलाचे सहकार्य केले

    सध्या अवकाळी पावसाने शेत शिवारातील कामे तशी बंदच आहेत. परंतु शेताकडे जाऊन येतो असे म्हणून योगेश आपल्या आई-वडिलांना घरून सांगून निघाला, मात्र शेतातील तुटलेली वायर जोडण्याच्या प्रयत्नात त्याच्या जीवनाचीच तार तुटली. शेतकरी अशोक रामचंद्र पाटील यांचा योगेश हा एकुलता एक मुलगा होता. योगेश शेतातच काबाडकष्ट करून केळीचे उत्पन्न घ्यायचा. सुस्वभावी आणि मनमिळावू योगेशच्या अकाली जाण्याने हिवरी-हिवरखेडा परिसरावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

    #crime farmer Jamner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी

    May 15, 2026

    कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!

    May 15, 2026

    सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!

    May 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif