“भुजबळ सर्वात गेलेला मंत्री..”, जरांगेंचा जळगावात घणाघात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांचे राज्यभर दौरा सुरु आहे. आज ते जळगावात आले असून सभेला उपस्थित असणाऱ्यांना संबोधित करत आहेत.

पहा थेट प्रक्षेपण👇👇

https://fb.watch/oIeGoxWobP/?mibextid=dhYx9A

काय म्हणाले जरांगे पाटील.. 

मराठ्यांची एकी पाहून आनंद होतोय.. विनाकारण मराठ्यांना बदनाम केलं जातंय. हे खेकड्यासारखे आहेत दुसऱ्याचे पाय मागे ओढताय. आज मराठ्यांनी त्यांचे षडयंत्र तोडले. सर्व गाव खेड्यातील ओबीसी बांधव आपल्या सोबत आहेत. नाईलाजाने ते त्यांच्यासोबत गेले. ३५ वर्षांचा अनुभव असणारा हा मंत्री अभ्यासच करत नाहीय. कायद्याच्या पदावर बसणाऱ्या माणसाने भान ठेवले पाहिजे . मंत्री पदाची शपथ घेऊन जातीय तेढ निर्माण करतोय. याने तर सर्व महापुरुषांच्या जात लायकी काढली असा सर्वात गेलेला मंत्री मी कधीच पहिला नाही, असा एकेरी उल्लेख करत जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर घणाघात केला.

– आम्ही कोणाच्या देण्याघेण्यात नव्हते तरीपण आम्हाला का डिचवले ?

– मराठ्यांचं आरक्षण स्वतःच्या बुडाखाली का लपवून ठेवलं आहे.. जास्तीचं खाऊ नका ज्याचं त्याला द्या..

– महाराष्ट्राच्या जनतेचं ओरबाडून खाल्लंय.. मी अस्सल शेतकऱ्याचा पोरगा आहे उलटा पुलटा केल्याशिवाय सोडणार नाही. आम्ही छातीवर गोळ्या झेलल्या आहेत आम्ही कोणाला घाबरत नाही. हे आम्हाला शत्रू मानत आहे, आमचं काय चुकलं आमच्या सरकारी नोंदी असून पण आम्हाला आमचा हक्क का मिळत नाहीय. तुम्हाला काय करायचं ते करा मी मराठ्यांसाठी लढणार मी कोणाला भीत नाही.

 – मराठ्यांच्या लेकरामागे उभे राहा हाच लेकरू तुमच्या पाया पडेल. अनेक मराठा मुलांचे करियर आरक्षणामुळे बरबाद झालेय. त्यांचे नुकसान होऊ देऊ नका.  हीच वेळ आहे सोबत उभी राहण्याची आणि आरक्षण आपल्या पदरात पडायची.. २४ डिसेंबर पर्यंत आपली कसोटी आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. हि सभा नाहीय हि आपल्या लेकराची वेदना आहे.

– कोणीच आरक्षणासाठी जातीवाद करू नका. आमच्या नोंदी सापडल्या आहेत आम्हाला आरक्षण द्यावेच लागेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.