अभिनेता ज्युनिअर मेहमूद यांची प्रकृती चिंताजनक !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

‘ब्रह्मचारी’ फेम अभिनेता ज्युनियर महमूद गेल्या दोन महिन्यापासून मृत्यूशी झुंज देत आहे. ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल अचानक कमी झाल्यामुळे त्यांचे वजन कमी व्हायरल सुरुवात झाली. अशी माहिती, ज्यु. महमूदचा भाऊ सलाम काजीने एका मुलाखतीमध्ये दिली आहे.

ज्युनियर महमूद यांची नोव्हेंबर महिन्यामध्ये हेल्थ चेकअप करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना कॅन्सरचे निदान झाले. सध्या ज्युनियर महमूद यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजवर आहे. यामुळे त्यांची तब्बेत फार खालावली आहे. डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, ज्युनियर महमूद यांच्यासह त्यांच्या फॅमिलीकडे, शेवटचे ४० दिवस राहिले आहेत. अभिनेता आणि कॉमेडियन जॉनी लिव्हर यांनी ज्यु. मेहमूद यांची भेट घेतली. त्यासोबतच यावेळी त्यांनी ज्यु. मेहमूदच्या तब्येतीची विचारपूस करत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ज्यु. महमूदचा भाऊ सलाम काजीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहिती प्रमाणे, ‘सुरुवातीच्या दिवसांमध्ये ज्यु. महमूदला किरकोळ त्रास होत होता. काही दिवसानंतर अचानक यांच्या वजनमध्ये घाट व्हायला लागली. त्यांचं हेल्थ चेकअप केल्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये गाठ असल्याचे सांगण्यात आले. यकृत, फुफ्फुसात कर्करोग आणि आतड्यांमध्ये गाठ असल्याने त्यांना डॉक्टरांनी सांगितले

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.