दुचाकीच्या धडकेत एक जण गंभीर ; दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा

0

जळगाव ;– ५७ वर्षीय व्यक्ती भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली होती. जखमीवर खासगी रूग्णालयात उपचार घेण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर शनिवारी २ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयुब अब्बास पटेल (५७, रा. सुप्रिम कॉलनी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अयुब पटेल हे आपल्या परिवारासह जळगावातील सुप्रिम कॉलन परिसरात राहायला असून मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. अयुब पटेल हे १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाता मेहरूण तलावजवळील ट्रकने जात होते. कबुतर खानासमोरून जात असताना त्यांना भरधाव अज्ञात दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात पटेल यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खागसी रूग्णालयात उपचार करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर शनिवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.