शॉक लागून शिरसोलीच्या एकाचा मृत्यू

0

जळगाव :- शिरसोली येथील ६० वर्षीय वृद्धाचा वेल्डिंगचे काम करीत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी एमआयडीसीतील सेक्टर डी-२७ मध्ये दुपारी सुमारास घडली. भीमराव धोंडू पाटील (रा. लांजन) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिरसोली येथील लमानजन येथे भीमराव हे पत्नीसह वास्तव्यास होते. एमआयडीसीतील पंचरल ट्रेलर्स येथे ते वेल्डर म्हणून कामाला होते. बुधवारी दुपारी २.३५ वाजेच्या सुमारास वेल्डिंग काम करतअसताना अचानक त्यांना इलेक्ट्रिक शॉक लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार इतर कामगारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वरु ग्णालयात हलवले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाटील यांनी मृत घोषित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.