जळगाव :- कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेल्या सतीश सुधाकर जगताप (रा. समर्थ कॉलनी) यांच्या मालकीचा नवीपेठेतील फोटो स्टुडिओ फोडून दोन फोटो प्रिंटरसह कागदपत्रे व झेरॉक्स मशीनचे सुटे भाग लांबवले. ही घटना बुधवारी सकाळी १० वा. उघडकीस आली आहे. शाई सांडल्यामुळे चोराच्या पायाचे ठसे दुकानाच्या मागील बाजूस उमटलेले होते. याबाबत जगताप यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सोमवारी रात्री दुकानाला कुलूप लावून जगताप हे घरी निघून गेले. त्यानंतर मंगळवारी सकाळीच कुटुंबासह ते शिंदखेडा येथील कुलदेवतेच्या दर्शनाला गेले. गावाहून परतल्यानंतर बुधवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला.