हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त लसीकरण…

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त युवासेना जळगाव तर्फे खान्देश मिल कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, नेहरू चौक जळगाव येथे भव्य लसीकरण शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विधासभा संपर्कप्रमुख प्रा.समाधान पाटील व महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

दिनांक १९ ते ३१ जानेवारी दरम्यान सदर लसीकरण शिबीर सुरु राहणार आहे. या ठिकाणी १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोवॅक्सिन तसेच कोविशील्ड चा पहिला, दुसरा व बुस्टर डोज उपलब्ध राहणार आहे.

यावेळी माजी महापौर नितीन लद्धा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवती सेना विस्तारक डॉक्टर प्रियांका पाटील, नगरसेवक ललित कोल्हे, नितीन बर्डे, अनंत जोशी, प्रशांत नाईक, गजानन मालपुरे, चेतन शिरसाळे, पवन सोनवणे, सरिता माळी कोल्हे, महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी, मंगल बारी, मनीषा पाटील, निळू इंगळे, युवासेना महानगरप्रमुख स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, यश सपकाळे, सागर हिवराळे, गिरीश सपकाळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासैनिक स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, प्रीतम शिंदे, शंतनू नारखेडे, अमित जगताप, हितेश ठाकरे, संकेत कापसे, संदीप सूर्यवंशी, चेतन कापसे, उमाकांत जाधव, अमोल मोरे, सौरभ कुलकर्णी, प्रशांत वाणी, वैष्णवी खैरनार, यशश्री वाघ, सायली गांधी, पियुष गांधी, जय मेहता, राहुल चव्हाण, सचिन चौधरी, विजय लाड, अतुल घुगे, जितू बारी, अंकित कासार, इत्यादी परिश्रम घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.