ईडीच्या नावाने वसुली होत आहे; संजय राऊतांचे मोठे गौप्यस्फोट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाभवनात ही पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत ते मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे..

हिंमत असेल तर माझ्या घरी या…

ईडीवाल्यांनो ऐका, हिंमत असेल तर माझ्या घरी या…मै नंगा आदमी हू, मै शिवसैनिक हू…तुम्ही कितीही मला अडकवण्याचा प्रयत्न करा, जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे, हे नाव ऐकून मुंबई आणि ईडीच्या अधिकाऱ्यांचा श्वास बंद होईल. चार महिन्यांपासून बिल्डर्सकडे वसुली सुरु आहे. ईडीच्या नावाने वसुली होत आहे. याची ईडीला सुद्धा माहिती आहे. हे कोण आणि कोणाची माणसं याचा डेटा आहे. मी सर्वात आधी पंतप्रधान मोदींना, अमित शहांना देणार आणि त्यानंतर तुम्हाला सांगेन…जितेंद्र नवलानी, फरिद शमा, रोमी आणि फिरोज शमा कोण?

मुंबईतल्या ६० लोकांनी ३०० कोटी जमा केले. कुठं झालं मनी लाँड्रिंग आणि ईडीचे लोक कुठं बसतात काय करतात? हे मी देशाला सांगेन. मला गोळी मारा, जेलमध्ये टाका काहीही करा मी घाबरणार नाही.

नील सोमय्यांना ताबडतोब अटक करा…

पीएमसी बँक घोटाळ्यात किरीट आणि नील सोमय्या यांना ताबडतोब अटक करा. पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे, सगळे पेपर्स मी ईडीकडे तीन वेळा पाठवले. गेल्या तीन महिन्यात किमान तीन वेळा ईडी कार्यालयात पाठवले. तुम्ही एक दोन गुंठेवाल्यांना बोलावता. किरिट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून दही आणि खिचडी खात असल्याचं मी बघितलंय.

माझं बोलणं आज ऐकावं लागेल
राकेश वाधवान पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आहे. बराच मोठा बिल्-डलर आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आहे. राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यावर २० कोटी गेलेत, हे सर्वांना माहितीय. ईडी वाले सुनो, माझं बोलणं आज ऐकावं लागेल. ईडी आणि सीबीआय पंतप्रधान आणि गृहमंत्री आज माझं बोलणं ऐकतायत हे मला माहितीय.

सोमय्या म्हणाले की, राकेश वाधवान भयंकर माणूस आहे, घोटाळा केला म्हणतात. पण निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कुणाची आहे, ही कंपनी सोमय्यांची आणि त्यांच्या मुलांची आहे, तो राकेश वाधवान यांचा पार्टनर आहे. त्यांचा वसईत प्रकल्प आहे. पीएमसी घोटाळ्यातला मुख्य आरोपी असलेल्या वाधवानकडून कोट्यवधी रुपयांची जमिन लाडानी याच्या नावावर घेतली. रोख रक्कमसुद्धा घेतली ही रक्कम ८० ते १०० कोटींच्या घरात आहे. जमिन लडानीच्या नावावर घेतलीय. वसईत ४०० कोटी रुपयांची जमिन साडेचार कोटी रुपयांना घेतली.

दुधवाला ७ हजार कोटीचा मालक?

मला कुणीतरी म्हटलं की, तुम्ही जिथे कपडे शिवले तिथेही गेले. ईडी हा काय प्रकार आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो. टेलरकडेसुद्धा हे लोक गेले, किती पैसे दिले, किती सुट दिले. आता फक्त चप्पल वाल्याकडे जायचं बाकी राहिलंय. तुम्ही कुठेही जा पण सामना शिवसेनेशी आहे. एक दुधवाला आहे हरयाणाचा, एस नरवल, मी विचारतो ईडीला की तुम्ही त्याला ओळखता का, फक्त पाच वर्षात दुधवाला, ७ हजार कोटीचा मालक कसा बनतो, कुणाचा पैसा? जेव्हापासून महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं. तेव्हापासून महाराष्ट्रात येणं जाणं सुरु झालं. भाजपच्या नेत्यांच्या घरात येणं जाणं सुरु होतं आणि त्याची संपत्ती वाढली. कुणी केलं मनी लाँड्रिंग, ७ हजार कोटी रुपयांपैकी साडे तीन हजार कोटी हे महाराष्ट्रातून गेली. महाराष्ट्रात जो घोटाळा, भ्रष्टाचार झाला त्यातून हे झाले. महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा आहे तो फडणवीस सरकारच्या काळातला.

जेलमध्ये माझ्यासोबत तुम्हीही असणार

मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या हिशोबाला हे लोक लागले. हारवाले, मंडपवाले, मेहंदीवाल्याकडे गेले. किती पैसे दिले अशी विचारणा केली. गुजरातमध्ये इतका घोटाळा झाला त्याचं काहीच केलं नाही. भाजपच्या एका मंत्र्याच्या मुलीचं लग्न झालं. त्यात जंगलाचा सेट केला. त्यात कार्पेट टाकलेलं त्याची किंमत साडेनऊ कोटी होती. घरात शिरायचं नाही, पण तुम्ही आमच्या घरात शिरताय, मुलांच्या, नातेवाईकांच्या घरात शिरताय. जेलमध्ये टाकणार आहात, टाका… पण माझ्यासोबत तुम्हीही असणार आहात.

पहाटे चार वाजता गरीब लोकांना ईडीच्या कार्यालयात आणून बसवलं. माझ्या आय़ुष्यात कधीच चुकीचं काम केलं नाही. २० वर्षांचे स्टेटमेंट घेऊन गेले. ईडीचा तपास गंमतीचा आहे. माझं गाव अलिबाग, माझी जमिन अलिबागला असेल ना, मॉरिशिअसला नसेल ५० गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय. ५० गुंठे जमिनीसाठी ईडीच्या लोकांनी तिथल्या गावात नातेवाईकांना पहाटे चार वाजता गरीब लोकांना ईडीच्या कार्यालयात आणून बसवलं, संजय राऊतांच्या विरोधात लिहून दे, तुला किती कॅश दिली असं त्यांना धमकी दिली. गरीब लोक घाबरतायत ते, १२ – १४ तास त्यांना बेकायदा डांबून ठेवलं. कोणत्या कायद्याने कोणता तपास करताय. ५० गुंठे जमिनीचा तपास करताय? किती तपास पडलाय ईडीसमोर.

त्यांनी जे आरोप केले आहेत, की आमचे १९ बंगले आहेत. आपण ४ गाड्या करून त्या १९ बंगल्यांमध्ये पिकनिकला जाऊ, पत्रकारांची पिकनिक काढू जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडेन , दिसले नाहीत तर अख्खी शिवसेना जोड्याने मारेल. दिशाभूल, खोटेपणाचा कळस, भंपकपणा करायचा कशासाठी, चला दाखवू त्यांना लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचा. मराठी माणसाचा द्वेष, महाराष्ट्राविषयी असूया, हायकोर्टात सोमय्यांनी मराठी भाषा मुंबईतून, शालेय शिक्षणात सक्तीची असू नये यासाठी धाव घेतली होती. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची, आणि मुंबईत मराठी कट्टा चालवतात..

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ले सुरु आहेत. शिवसेनेनं आतापर्यंत उत्तर दिलं होतं. आधी लोकांसमोर वस्तुस्थिती येऊद्या असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ही पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घेणार होतो. पण सुरुवात इथून आणि अंत तिथे करु. महाराष्ट्रात येऊन आमच्या घरात घुसणार, आमच्या बायका मुलींकडे बघणार, भाजपवाले टाळ्या वाजवणार?

माझ्या मित्रांवर धाडी पडत होत्या. जे आरोप माझ्यावर झाले त्यातलं एकही प्रकऱण खरं नाही. मराठी माणसाने धंदा करू नये असं त्यांना वाटतं.खोट्या नावाने फोन करायचे, तुमच्याकडे ईडी, सीबीआय येतंय. तुमच्या वडिलांना अटक केली जाईल अशा धमक्या दिल्या जातात. भाजपने महाराष्ट्रात नालायकपणा सुरु केलाय.

मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेतो, राऊतांच्या घरी ईडीचे लोक पोहोचणार आहेत सांगितलं जातं, तुमच्या तपास यंत्रणांचा असा गैरवापर करून असा त्रास देता आणि तुम्हाला वाटतं की झुकू, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला गुडघे टेकायला शिकवलं नाही, तुम्ही काहीही करा सरकार पडणार नाही.

तुम्ही काही बोलू शकता असं मी त्यांना सांगितलं, पण ठाकरे सरकारला नख लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही. सध्या पवार कुटुंबाकडून धाडी पडतायत. तेसुद्धा प्रकरण सोपं नाही. त्यांनासुद्धा टाइट करणं सोपं नाही. शरद पवार यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर एक दिवसाने धाडी पडायला लागल्या. त्यांच्या नातेवाईकांच्या घरात धाडी टाकल्या. आठ आठ दिवस घरात जाऊन बसले. धमक्या दिल्या जाऊ लागल्या. त्यांना मी सांगितलं की, तुम्ही भानगडीत पडू नका. यावर त्यांनी केंद्रीय पोलिस बल आणून तुम्हाला थंड करू असंही सांगण्यात आलं. तिसऱ्या दिवशी लगेच ईडीच्या धाडी माझ्या जवळच्या लोकांवर सुरु झाल्या. पहाटे तीन, चार वाजता धाड पडायला लागली.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर…

अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने हल्ले करतायत ते देशावरचं संकट आहे. असंच संकट पश्चिम बंगालवरही आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरुय. खोटे आरोप, बदनामी सुरु आहे.एक तर तुम्ही गुडघे टेका किंवा सरकार आम्ही घालवू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातायत. भाजपचे प्रमुख पक्ष रोज तारखा का देतायत. महाराष्ट्रात १७० चे् बहुमत असताना भाजपचे लोकं दोन दिवसांनी एक तारीख देतात. आता दहा मार्चनंतर बोलतायत. हे तुम्ही कोणाच्या भरोशावर देताय.

महाराष्ट्रावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरु आहे त्याविरोधात कुणीतरी रणशिंग फुंकायला हवं होतं ते आपण शिवसेनेच्या वास्तूतुन फुंकतोय. बाळासाहेबांनी मंत्र दिला होता तो आयुष्यभरासाठी आहे. तु काही पाप केलं नसेल, गुन्हा केले नसेल तर तुमचं मन साफ आहे कुणाच्या बापाला घाबरू नका असं बाळासाहेब सांगायचे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा याच पद्धतीने पक्षाला पुढे घेऊन जातायेत. आम्हाला संदेश द्यायचाय की महाराष्ट्र गांडुची औलाद नाही, मराठी माणूस बेईमान नाही आणि तुम्ही कितीही नामर्दानगी करून वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं असल्याचं राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.