चोरगाव शिवारात बिबट्याची दहशत

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

धरणगाव तालुक्यातील चोरगाव शिवारात बिबट्याने गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला असून, सध्या या परिसरामध्ये शेतीची कामे जोरात चालू असल्यामुळे व शेतात काम केल्याशिवाय मजुरांना पर्याय नाही. परंतु शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

काल चोरगाव येथे मंगल विठ्ठल सोनवणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासराचा फडशा बिबट्याने पडला. यापूर्वी 27 जानेवारी रोजी चोरगाव येथेच दोन वासरे बिबट्याने फस्त केली होती. आव्हाणी येथे आठ दिवसांपूर्वी गुरांवर हल्ला केला होता. सतत घडत असलेल्या घटनांमुळे नदीकाठावरील चोरगाव, नंदगाव, देवगाव, फुकणी, नारणे, आव्हाणी, दोनगाव या गावांमधील ग्रामस्थ, शेतकरी भयभीत झालेले होते. शेतकरी रात्री पिकांना पाणी द्यायला जाण्यासाठी जीव मुठीत धरून जात आहेत. गुरे चारणाऱ्यांना बिबट्याची दहशत झाली आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे यासाठी जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार आज चोरगाव ते देवगाव-फुकणी रस्त्यावर पिंजरा लावण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील स्वतः उपस्थित होते. वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई, चोरगाव सरपंच ज्ञानेश्वर सोनवणे, जंगु बापू सोनवणे, काशीनाथ सोनवणे, अनिल पवार, मच्छिद्र सोनवणे, मस्तान शाह व इतर उपस्थित होते.

चोरगाव, देवगाव, फुकणी, नंदगाव, नारणे, आव्हाणी, दोनगाव परिसरात असलेला बिबट्याचा वावरामुळे माणसांना धोका होण्याची शक्यता असल्याने वन्य अधिकाऱ्यांना सांगून बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावलेला आहे. लवकरात लवकर बिबट्या पकडला पकडला जाईल अशी आशा आहे.

– जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.