लाच स्वीकारतांना तलाठी ACBच्या जाळ्यात

0

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिरपूर (Shirpur) तालुक्यातील पिंपळे येथील तलाठी डी. जी. बोरसे (Talathi D. G. Borse) यांना 800 रुपयाची लाच स्वीकारतांना आज दी. 23 ऑगस्ट रोजी होळनांथे येथे अटक करण्यात आली.

तक्रारदार यांनी आपल्या सातबारा उताऱ्यावरील नावात कुळ दुरुस्त करून देण्यासाठी संबंधित तलाठीकडे शासनाच्या नियमानुसार परिपूर्ण कागदपत्र दिल्यानंतर देखील सदर काम करण्यास टाळाटाळ करत होते. तरी सदरील काम करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून तक्रारदाराची इच्छा नसताना आठशे रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Bureau) कार्यालयाशी संपर्क साधून सदर आरोपी विरुद्ध तक्रार केली असता, त्या तक्रारीची पडताळणी करण्याकरिता आज दी. 23 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता तलाठी कार्यालयाभोवती सापळा रचून बसले होते. होळनांथे येथून आठशे रुपयाची लाच घेतांना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठीस रंगेहात पकडून त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली.

सदर घटनेची कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्यासह मंजितसिंह चव्हाण, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, प्रशांत बागुल, राजन कदम, कैलास जोहरे, शरद काटके, संदीप कदम, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, संतोष पावरा, रामदास बारेला आदींनी कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.