धक्कादायक; जेवायला न दिल्याने नातुनेच आजीचा केला खून…

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क;

नातवाने आपल्या आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या हरसूल येथे घडली आहे. गंगुबाई रामा गुरव असे मृत्यू झालेल्या आजीचे नाव असून हरसूल पोलीस ठाण्यात नातवाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, गंगुबाई रामा गुरव (७०) या त्यांच्या कुटुंबीयांसोबत नाशिक जिल्ह्यातील हरसूल गावातील इंदिरा नगर भागात वास्तव्यास आहे. त्यांच्या सोबत मुलगा, सून आणि नातू राहतात. नातू दशरथ किसन गुरव (२२) याला दारू पिण्याची सवय होती. सोमवारी रात्री दशरथ हा दारू पिऊन घरी आला होता. रात्री जेवायला दिले नाही याचा राग आल्याने दशरथ याने आजीच्या उजव्या डोळ्याजवळ हातात घातलेल्या लोखंडी कड्याच्या सहाय्याने वार केला. यात आजी गंगुबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या. दशरथ नशेत असल्याने त्याने रात्री काय केले हे त्याच्या लक्षात आले नाही. मंगळवारी सकाळी उठल्यावर आजी गंगुबाई यांचा मृत्यू झाला असल्याच लक्षात आल.

सदर घटनेबाबत हरसूल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी नशेत असलेला नातू दशरथ गुरवला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.