सिद्दीक कप्पन हाथरस प्रकरणी 26 ऑगस्ट रोजी सुनावणी…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

पत्रकार सिद्दीक कप्पनला ऑक्टोबर 2020 मध्ये हातरस येथे एका दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी हातरसला जात असताना अटक करण्यात आली होती. त्याचवेळी कप्पनवर यूएपीए (UAPA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पन यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. पत्रकार कप्पन यांनी याचिका दाखल करून अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले. ज्यावर सुप्रीम कोर्टानेही लवकर सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. आता या प्रकरणावर २६ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. 3 ऑगस्ट रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने हातरस येथील दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी वातावरणात तणाव असतानाही तेथे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकार सिद्दीक कप्पन यांना दिलासा दिला नाही.

कप्पनवर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) गुन्हा दाखल केल्यानंतर, त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे, सध्या कप्पन मथुरा जिल्हा कारागृहात आहे. न्यायमूर्ती कृष्णा पहल यांच्या एकल खंडपीठाने सिद्धिक कप्पनचा जामीन अर्ज फेटाळताना हा आदेश दिला. यापूर्वी 2 ऑगस्ट रोजी आरोपी आणि सरकार पक्षातर्फे उपस्थित वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. हातरस येथील दलित मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी कप्पनला ऑक्टोबर 2020 मध्ये हातरसला जात असताना अटक करण्यात आली होती.

त्याचवेळी कप्पनवर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मल्याळम न्यूज पोर्टल अझीमुखमचे वार्ताहर आणि केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्टच्या दिल्ली युनिटचे सचिव सिद्दीक कप्पन यांना ऑक्टोबर 2020 मध्ये इतर तिघांसह अटक करण्यात आली होती. हातरस जिल्ह्यातील एका रुग्णालयात १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार आणि मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची बातमी देण्यासाठी कप्पन त्यावेळी हातरसला जात होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी हातरसला जात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.