कन्येला न्याय मिळण्यासाठी खान्देश तेली समाज मंडळाचे निवेदन

0

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिरपूर तालुक्यातील कन्या टेकवाडे येथील माहेर असलेली स्व. कविता गोकुळ चौधरी हिला तिच्या सासरी चाळीसगाव येथे लग्नापासूनच सासुरवास होता. लग्नापासूनच तिचा सासरा, पती, सासू यांच्याकडून छळ होत होता. या छळाचा अंत दिनांक ३० रोजी तिची गळा दाबून हत्या करून करण्यात आला. पती, सासू व सासरा यांनी तिचे गळा लागून हत्या केल्याचा खान्देश तेली समाज मंडळ व तेली समाज पंचमंडळ शिरपूर यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत असून तिच्या मारेकरींना कठोरात कठोर शासन व्हावे व सदरचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा अशा आशयाचे निवेदन आज खान्देश तेली समाज मंडळ व तेली समाज पंचमंडळ, शिरपूर यांच्यावतीने तहसीलदार शिरपूर यांना देण्यात आले.

निवेदनातून शिरपूर तालुक्यातील कन्या असलेली स्व. कविता हिला न्याय मिळवून देण्यासाठी योग्य तो निर्णय शासनाने घ्यावा व आरोपींना कठोरात कठोर शासन करावे आणि आपल्या तालुक्यातील कन्येला न्याय मिळवून द्यावा असे सुद्धा यावेळी सांगण्यात आले.

निवेदन शिरपूर तेली समाज पंच मंडळाचे अध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष दिनेश चौधरी, उपाध्यक्ष किशोर चौधरी, सचिव चौधरी, उपाध्यक्ष तुषार चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शामकांत ईशी, संजय चौधरी, राजेंद्र चौधरी, जगदीश चौधरी, संतोष चौधरी, रमेश चौधरी, सुरेश चौधरी, ईश्वर चौधरी, चंद्रवदन चौधरी, मोहन चौधरी, महेश चौधरी, युवराज चौधरी, नरेश चौधरी, आशिष चौधरी, दुर्गेश चौधरी, विजय चौधरी, जितेंद्र चौधरी, योगेश चौधरी, उत्तम चौधरी, विजय चौधरी, सुरेश चौधरी, भरत चौधरी, सोनू चौधरी, जयेश चौधरी, किशोर चौधरी, सुनील चौधरी, मनोज चौधरी, चेतन भालचंद्र चौधरी, गजानन चौधरी, भावेश चौधरी, विष्णू चौधरी, भूपेंद्र चौधरी, गुरव पटेल, अजय पाटील, मयूर चौधरी, गजानन चौधरी, पवन चौधरी, गजू पाटील, आकाश चौधरी, युवराज चौधरी, नरेंद्र मराठे, अजिंक्य शिरसाट, दिगंबर पाटील, सतीश भोई, सोहम चौधरी, शुभम वाडीले, रोहन धनगर, जगदीश शेटे, मयूर धोबी, दिलीप सोनार, अजय मारवाडी, ज्ञानेश्वर चौधरी, वीरेंद्र चौधरी व असंख्य समाज बांधव व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.