मोठी बातमी; अनिल देशमुखांना जामीन…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तत्कालीन माविआ (Maha Vikas Aaghadi) सरकारचे गृहमंत्री ( Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात ईडीने (ED) मनी लाँड्रिगचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आज उच्च न्यायालयाकडून 11 महिन्यांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाला आहे. मात्र, अनिल देशमुख लगेच तुरुंगाबाहेर येणार नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे.

ईडीने (ED) या जामिनास विरोध केला आहे. जामिनाविरोधात शासनाच्या महाधिवक्त्यांनी (Advocate General) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाणार असल्याचे न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने जामिनास 13 ऑक्टोबरपर्यत स्थगिती दिली. त्यामुळे जामिन मिळाला असला तरी देशमुख लगेच तुरुंगाबाहेर (Jail) येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.