Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बायको नांदत नसल्याने जावयाकडून पत्नी, मेहुणा, सासूचा खून
    गुन्हे वार्ता

    बायको नांदत नसल्याने जावयाकडून पत्नी, मेहुणा, सासूचा खून

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 21, 2023No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    शिर्डीच्या सावळीविहीर गावात थरारक घटना घडली आहे. बायको नांदत नसल्याने जावयाने धारदार शस्त्राने वार करत पत्नी, मेहुणा व सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्री घडली. पत्नी माहेरी राहत होती. अशात काल मध्यरात्री जावयाने पत्नीच्या घरी जात सासरच्यांवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, जावयाच्या हल्ल्यात सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून जावयाने हा हल्ला केलाय.  सुरेश निकम असे आरोपी जावयाचे नाव आहे. हल्ल्यानंतर आरोपी सुरेश फरार झाला होता. त्याच्या हल्ल्यात पत्नी वर्षा सुरेश निकम (24), मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड (25) आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड (70) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शिर्डी हादरली आहे.

    हल्ल्याचे कारण 

    शिर्डीच्या सावळीविहीर गावात राहणाऱ्या आरोपी सुरेश निकम याचा आपल्या पत्नीसोबत आणि तिच्या माहेरच्या मंडळीशी अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. पत्नी माहेरी राहत असल्याने पती-पत्नीमध्ये वाद होता. या वादातूनच आरोपी सुरेशने हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर, मृत वर्षा सुरेश निकम यांची भावजई श्वेता गायकवाड यांनी घटनेबाबत सांगितले की, रात्री अचानक आरोपी सुरेश निकम आले. दरवाजा उघडल्यानंतर लगेच वार करण्यास सुरूवात केली. पाच ते दहा मिनिटात सहा जणांवर वार केल्यानंतर सुरेश पळून गेला. आरोपी सुरेशला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहीजे, अशी मागणीही त्यांनी केली.

    दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी जावई सुरेश निकम फरार झाला होता. पोलिसांनी शोध घेत त्याला नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादातून रागाच्या भरात हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सासू, सासरे आणि मेहुणी यांना शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

     

    #murder crime news shirdi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif