पालकमंत्री गुलाबरावांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना घातली ‘टोपी’ !

0

जळगाव ;- शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचे आज दुपारी #जळगाव विमानतळावर आगमन झाले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज २ वाजेच्या सुमारास आगमन झाले. यावेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन ,आ. राजूमामा भोळे आदी उपस्थित होते . तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव येथे आगमन झाले . यावेळी कार्यक्रमस्थळी मान्यवरांचे स्वागत करण्यात येत असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोपी घातली . यामुळे उपस्थितांमध्ये याबाबत एकच चर्चा रंगली होती .

Leave A Reply

Your email address will not be published.