शरद पवार यांच्या हस्ते होणार आ. मुरलीधरअण्णांच्या पुतळ्याचे अनावरण !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क; 

धरणगाव; तालुक्यातील चांदसर येथे माजी आमदार मुरलीधरअण्णा पवार यांचा पुतळा उभारण्यात आला असून याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी शरद पवार १५ मार्च रोजी जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत.

या कार्यक्रमासाठी खासदार शरद पवार हे १५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता चांदसर येथे येणार आहेत या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी दिली.

शरद पवार यांच्या या दौर्‍यात ते राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पक्षाचा मेळावा घेऊ शकतात. तथापि, त्यांच्या दौर्‍याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.