शेंदुर्णी नगरपंचायत मार्फत माझी वसुंधरा अंतर्गत भव्य स्पर्धेचे उत्साहात

0

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेंदुर्णी नगरपंचायत मार्फत माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत *माझी वसुंधरा हरीत स्पर्धेचे* येथील पारस मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले. ह्या स्पर्धे अंतर्गत चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, टाकाऊ पासून टिकावू स्पर्धा राबविण्यात आली.

ह्यात मोठ्या संख्येने सरस्वती विद्यालय, गरुड प्राथमिक व सेमी इंग्लिश, माध्यमिक, महाविद्यालय, ललवाणी शाळा, गुरुकुल मराठी -इंग्लिश मिडीयम, जि. प. उर्दू कन्या, जि. प. मराठी कन्या व मराठी मुलांची शाळा इ. शाळेतील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवीला.

ह्या स्पर्धेत 300 च्या वर विद्यार्थी सहभागी झाले होते. निबंध व चित्रकला स्पर्धेत १ ली ते ७ वी व ८ वी ते १२ वी असे दोन गट आणि रांगोळी व टाकावू पासून टिकावू स्पर्धा ही खुल्या गटात घेण्यात आली.नगरपंचायत च्या नगराध्यक्षा विजयाताई खलसे यांनी वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे सांगितले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेंदुर्णी नगरपंचायतचे मा. मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, ज्या प्रमाणे पैसे ठेवण्यासाठी बँकची आवश्यकता आहे त्याप्रमाणे आपल्यासाठी ऑक्सीजन घेणेसाठी झाडे लावणे आवश्यक आहे.वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम यासारख्या कामांना प्राधान्य देऊन नगरपंचायतने आपल्या कार्याचा ठसा उमटवला असल्याचे सांगितले.

नगरपंचायतने आयोजित केलेल्या विविध स्पर्धामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

तसेच सदर विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थीचे अभिनंदन केले.

वसुंधरा’ व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत राबविलेले उपक्रम प्रेरणादायी आणि सर्वांना प्रोत्साहन देणारे असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष निलेश थोरात यांनी केले.

स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थांना प्रशस्तीपत्र,ट्रॉफी व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना लवकरच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

तसेच या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणुन नगरपंचायत चे नगराध्यक्षा विजयाताई खलसे , मुख्याधिकारी साजिद पिंजारी , उपनगराध्यक्ष निलेश थोरात , नगरसेवक व नगरसेविका, समाजसेवक गोविंदजी अग्रवाल, अमृतबापू खलसे डॉ. विजयानंद कुलकर्णी शाळेचे शिक्षक आणि पत्रकार यांनी पाहणी केली.

कार्यक्रमासाठी लोकेश साळी व आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.