मोठी बातमी; शरद पवारांचा राजीनामा, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणात कोणी विचारही केला नसेल असा खुलासा त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा आज शरद पवार यांनी केली.पवारांना राजीनामा मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. पक्षाचे सर्वच नेते राजीनामा मागे घ्या म्हणून शरद पवार यांना आग्रह धरत आहेत. काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. जयंत पाटील यांना तर बोलताना अश्रूच अनावर झाले. त्यांना बोलताही येईनासे झाले यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचे प्रकाशन झाले. शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राचा हा दुसरा भाग आहे. आपण कार्यकर्ता ते नेते कसे झाले, याची माहिती शरद पवार यांनी दिली.

त्यांनी या कार्यक्रमात कार्यकर्ता ते नेता, हा पल्ला कसा गाठला हे सांगितले. कसे त्याचे मोठ्या-मोठ्या नेत्यांची संबंध येत गेले. कशापद्धतीने त्यांना इंदिरा गांधींसोबत काम करायला मिळाले, ह्या सर्व आठवनींना उजाळा देत त्यांनी एक मोठी बाब सर्वांसमोर मांडली, ती बाब म्हणजे गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या (Nationalist Party) अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.

राजीनामा मागे घ्या, कार्यकर्त्यांच्या घोषणा
आपल्या लाडक्या नेत्याने असा अचानक राजीनामा देणे हे सर्वांसाठीच धक्कादायक बाब आहे. त्यामुळे सर्वच कार्यकर्ते शरद पवारांच्या निर्णयावर भावुक आले. निर्णय मागे घ्या… अशा घोषणा सुरू केल्या. नंतर कार्यकर्ते नेते शरद पवार यांच्या भोवती गोळा झाले. जयंत पाटीलही शरद पवार यांच्या बाजूलाच बसले. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली.त्यानंतर जयंत पाटील बोलायला लागले. पण त्यांना लगेच रडू फुटले. त्यांना बोलता येईना. जागेवरून उभे राहिले तर ते उभे राहू शकले नाहीत. पुन्हा खाली बसले. हातात माईक घेतला. बराचवेळ गप्प होते. डोळ्यातून अश्रू येत होते. डोळे पुसत होते…त्यानंतर मनाचा हिय्या करून जयंत पाटील (Jayant Patil) बोलू लागले. पुन्हा हुंदका दाटून आला. त्याच रडवेल्या आवाजात त्यांनी साहेब निर्णय मागे घ्या. तुम्हाला जी भाकरी फिरवायची ती फिरवा. मीही काही बोलणार नाही. आम्ही सर्व राजीनामे देतो. आमच्या सर्वांचे राजीनामे घ्या. पण तुम्ही पक्षाच्या अध्यक्षपदावरून जाऊ नका. अध्यक्षपदी कायम राहा, असा आग्रह धरत जयंत पाटील थांबले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.