जामनेरात पाऊस, गारपीट आणि वादळाचा धुमाकूळ

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

शहरातील अनेक भागात प्रचंड पाऊस वादळी वाऱ्यासह गारपिटीने अक्षरशः प्रचंड धुमाकूळ घालत नागरीकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. नागरिकांनी सुरक्षित जागेचा आश्रय घेतल्याने प्राणहानी टळली असुन काही नागरिक जखमी झाले आहेत. वाकी रोड स्थित असलेल्या साईनाथ नगरातील गोपाळ गजानन शिरसाठ यांच्या वरच्या मजल्यावरील पत्रे उडून गेले तसेच घरात साठविलेले अन्नधान्य व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच परीसरातील घरांना देखील याची झळ बसलेली आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली असून रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वादळी वाऱ्यामुळे विज खांब वाकले असून वीजतारा लोंबकळलेल्या स्थितीत असल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.