श्रीशांतच्या घटनेचा दाखला देत भज्जीचा विराट-गंभीरला सल्ला

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

कालचा आयपीएलमलधी (IPL) सामना वादामुळे चांगलाच चर्चेत राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) त्यांच्याच घरात पराभव केला. पण खेळ भावनेला ठेच पोहोचवेल असाच झाला. त्यामुळे या सामन्याने अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. विराट कोहली (Virat Kohli) आणि नवीन-उल-हक (New-ul-Haq) यांच्या वादावर अनेक क्रिकेटपटू प्रतिक्रिया देत आहेत. विराट कोहली या मॅचमध्ये LSG चा नवीन उल हक आणि गौतम गंभीरला (Gautam Gambhir) भिडला. परिस्थिती इथपर्यंत आली की, अन्य़ खेळाडूंनी विराट आणि गंभीरला वेगळं केलं. दोघांवर कारवाई करण्यात आली असून 100 टक्के मॅच फी कापण्यात आली आहे. अशातच भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने या वादावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा सुद्धा असच वाद श्रीशांत (Sreesanth) सोबत झाल्यामुळे आजही त्याला त्याची लाज वाटते, अस त्यांनी सांगितले आहे. पुढे तो म्हणाला कि तेव्हा ते बरोबर वाटते पण आता खरंच पश्चाताप होत आहे.”

हरभजन म्हणाला विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये जे काही झालं, ते क्रिकेटसाठी चांगलं नाहीय. 2008 साली हरभजन सिंग (Harbhajan Singh) सुद्धा अशाच एका वादात अडकला होता. त्याने भांडण केलं होतं. ज्याची आजही हरभजनला लाज वाटते. हरभजनने त्यावेळी मॅचनंतर श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. श्रीसंतला मैदानातच रडू कोसळलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.