अजय देवगणच्या ‘शैतान’चा फर्स्ट लूक आला समोर

0

मुंबई ;- बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण याने त्याचा आगामी सिनेमा ‘शैतान’चे फर्स्ट लूक समोर आले आहे. त्याचा हा लूक पाहूनसगळीकडे या चित्रपटाची उत्सुकता आहे. बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण आणि आर के माधवन यांचा सुपर नॅचरल थ्रीलर असा ‘शैतान’ सिनेमा आहे.

या फर्स्ट लूक शेअर केले आहे त्यात आर माधवन आणि ज्योतिका दिसत आहेत. सिनेमाच्या फर्स्ट लूकचे पोस्टर शेअर करत टीझर प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. शैतान हा सिनेना 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत आहे. विकास बहल यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अजय देवगणसह, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

या सिनेमाच्या नावावरुन तो कोणत्या प्रकारचा असणार आहे याचा अंदाज लावू शकता. हा सिनेमा थरारपट आहे. काळ्या जादूवर आहे. अजय देवगणचे 2024 मध्ये पाच सिनेमे रिलीज होणार आहेl. ‘शैतान’ या सिनेमाबरोबरच ‘औरो में कहां दम था’, ‘मैदान’, ‘सिंघम अगेन’ , ‘रेड 2’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.