जळगावातील कोळीपेठेत घराला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जुने जळगाव वाद कोळी पेठ या ठिकाणी महिला सकाळी देवपूजेसाठी मंदिरात गेली असता, घराला लागलेल्या आगेत संपूर्ण संसार जळून खाक झाला आहे. आगेच्या भक्षस्थानी असताना, मुलास जाग आल्याने त्याने स्वतःचा जीव वाचवून मदतीसाठी आरडा ओरड करून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

घटनास्थळावर नुकसानग्रस्त घरातील रहिवासी शितल कडू मराठी (वय ४०) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुने जळगाव कोल्हे वाडा जवळील कोळी पेठेत मुलगा हेमंत सोबत वास्तव्याला आहे. सकाळी आठ वाजता शितल या देवपूजेसाठी मंदिरात गेल्या असताना, घरात मुलगा हेमंत झोपलेला होता. अचानक त्याला विश्वास घेण्यास त्रास होऊ लागला व धुराचा वास आल्यामुळे तो झोपेतून उठला तेव्हा घरातील जवळ आगीचे लोटत होते. तसच हेमंतने खालच्या मजल्यावरील आजी व मामा यांना मदतीसाठी आरोळ्या मारल्या.

संपूर्ण घर आगेच्या भक्षस्थानी पडले. घरातून धुराचे लोट उठत असल्याने, परिसरातील तरुणांनी मदतीला धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपूर्ण घर आगेत जळून खाक झाले होते.

घटनेची माहिती मिळताच, शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तलाठी राहुल सोनवणे कोतवाल सुखदेव, सुखदेव तायडे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत आगीचा पंचनामा केला. झालेल्या नुकसानीची सखोल माहिती घेतली, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.