“सेलेना गोमेज” ४०० मिलियन फॉलोवर्स असणारी एकमेव अभिनेत्री

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

सोशल मीडियावर (Social media) प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्री स्वतः ला अपडेट ठेवत असतात. आणि चाहत्यांना सुद्धा त्यांच्याबद्धल जाणून घायला आवडत असते. आणि लोकप्रियतेत प्रत्येकाची एक रेस लागली असते असं म्हणायला हरकत नाही, तसेच आता लोकप्रियतेत आता एका अभिनेत्रीने सर्वांनाच मागे सोडला आहे. बॉलीवूड असो की हॉलीवूड सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येकाचा फॅन फॉलोअर्स वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगळा आहे. भारतामध्ये दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर तर विराट कोहली यांचा फॅन फॉलोअर्स मोठा असल्याचे दिसून आले आहे.

सध्या हॉलीवूडच्या एका सेलिब्रेटीनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंस्टावर जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत त्या सेलिब्रेटीनं बाजी मारली आहे. त्या सेलिब्रेटीचे नाव सेलेना गोमेज असून तब्बल ४०० मिलियन फॉलोअर्स मिळवून जी सर्वात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्स मिळवणारी ती पहिलीच महिला सेलिब्रेटी आहे. तिच्या फॉलोअर्सचा आकडा व्हायरल झाला आणि चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.