राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात अग्निवीर सैन्यदल भरती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग व क.ब.चौ.उ.म.वि. विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ मार्च ते १८ मार्च दरम्यान अग्निवीर सैन्यदल भरती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.डि.आर.पाटील होते तर प्रमुख अतिथी अग्निवीर सैन्यदल प्रशिक्षक व मार्गदर्शक सेवानिवृत्त सैनिक संदिप मन्साराम पाटील होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.एस.बी.भावसार, प्रा.पी.बी.पाटील, डॉ.आर.बी.नेरकर, प्रा.जे.बी.पाटील, प्रा.एस.सी. पाटील, डॉ.एम.आर‌.करंजे, डॉ.व्हि.एस.घुगे, डॉ.एस.बी.सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.एस.एन.साळुंखे यांनी केले.

प्रशिक्षक संदिप पाटील सदर कार्यशाळेत संदिप पाटील दररोज सकाळी प्रशिक्षण व मार्गदर्शन करीत होते.त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दररोज सकाळी व संध्याकाळी सराव केला, व्यायाम केला, जिद्द, चिकाटी आणि सातत्य ठेवले तर हमखास देशसेवा करायची संधी मिळेल असे सांगितले.उपप्राचार्य डॉ.एस.बी.भावसार यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना महाविद्यालयातील सुसज्ज पटांगणावर लांब उडी, गोळा फेक सराव सुरू आहे. त्याचा लाभ घेण्याचे सांगितले. डॉ.डि.आर.पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात अग्निवीर सैन्यदल भरती प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले .सदर कार्यशाळेतील प्रशिक्षण व मार्गदर्शनचा सैन्यदल भरती, पोलिस भरतीसाठी नक्कीच फायदा होईल. महाविद्यालयात असे विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्यात सहभागी होवून जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. सदर कार्यशाळेचे संस्थेचे अध्यक्ष ॲड.वसंतराव मोरे, संचालक पराग मोरे, संचालक ॲड.रोहन मोरे यांनी अभिनंदन केले. आभार प्रदर्शन डॉ.एस.बी.सावंत यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्राध्यापक व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.