आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू शरबत घेऊन उपोषण सोडले

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

थकीत कर्ज वसुलीतून ठेवीदारांच्या ठेवी ठेवीदारांना सम प्रमाणात वितरित केल्या जातील. तसेच लवकरात लवकर अंकेक्षण अहवाल तयार केला जाईल. महत्त्वाचे जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर रित्या गुन्हे दाखल करण्यात येतील अशी हमी देत ठेवीदारांच्या ठेवी संपूर्ण रित्या परत मिळेस्तोवर मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही आमदार राजेश एकडे यांनी उपोषणकर्त्यांना दिल्यामुळे आज १९ मार्च रोजी उपोषणकर्ते ठेवीदारांनी उपोषण मागे घेतले. उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात सुरेश नारायण मांडवेकर यांच्यासह इतर १४ ठेवीदारांनी १३ मार्च रोजी पासून आमरण उपोषणास प्रारंभ केला होता.

ठेवीदारांच्या ठेवी ठेवीदारांना तात्काळ परत मिळाव्यात. पतसंस्थेचा अंकेक्षण अहवाल सादर व्हावा. तसेच पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कायदेशीर रित्या गुन्हे दाखल व्हावेत अशा विविध मागणीस्तव ठेवीदारांनी आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान आज सातव्या दिवशी आमदार राजेश एकडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांची व्यथा समजून घेतली. दरम्यान सहाय्यक निबंधक महेश कृपलानी यांना या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना देत अंकेक्षण अहवाल तयार करण्यावर भर देणे, बाबत सूचित केले. त्याच प्रमाणे थकीत कर्जदारांकडून वसुली केल्यानंतर सदर रकमेतून सर्व ठेवीदारांना त्या रकमेचे समप्रमाणात वितरण केल्या जाईल. तसेच या प्रकरणी दोषी असलेल्या संबंधितांवर कायदेशीर रित्या गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल महत्त्वाचे म्हणजे ठेवीदारांना त्यांच्या कष्टाची पै अन् पै मिळेपर्यंत मी स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही आमदार राजेश एकडे यांनी देत ठेवीदार उपोषणकर्त्यांचे समाधान केले. आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते ठेवीदार उपोषणकर्त्यांना लिंबू शरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ, सोपान भाऊ शेलकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पाटील, तालुकाअध्यक्ष बंडू चौधरी, ईश्वर भदाले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.